दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
2. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणाऱ्यांचे तुकडे करू, मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकताना मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, फडणवीसांच्या बाबरी मशिदीवरच्या वक्तव्याचाही समाचार
3. ए म्हणजे औरंगजेब, बी म्हणजे भोंगे आणि सी म्हणजे हनुमान चालिसा, मुख्यमंत्र्यांच्या लेखी ओवेसी, मनसे आणि राणा दाम्पत्य म्हणजे भाजपची एबीसी टीम
4. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, उद्धव ठाकरेंविरोधात देवेंद्र फडणवीसांनी दंड थोपटले! आज फडणवीसांची सभा
शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा होतं आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बुस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. उद्या ( 15 मे) भाजपने सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
5. पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्टप्रकरणी अटकेतील अभिनेत्री केतकी चितळेला कोर्टात हजर करणार, संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून केतकीवर अंडी आणि शाईफेक
6. राष्ट्रवादीचा काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा, पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहित असल्याचीही टीका
7. उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात आजपासून आंदोलन, सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि सर्व शेतकरी संघटनांचे नेते एकत्र येऊन आंदोलन करणार
8. जी-23 गटाच्या सर्व सूचनांवर चिंतन शिबिरात सकारात्मक चर्चा, आवश्यक ते बदल करत असल्याची काँग्रेस नेत्याची माहिती
9. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू, वयाच्या 46 व्या वर्षी निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा
10. आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी CBIची मोठी कारवाई, देशात छापेमारी करुन सात जणांना अटक, आरोपींना पाकिस्तानमधून सूचना मिळत असल्याचा सीबीआयला संशय