दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. राज्यात मध्यरात्रीपासून पेट्रोल पाच रुपये, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त, शिंदे सरकारची महाराष्ट्राला भेट  


2. 18 वर्षांवरील नागरिकांना आजपासून मोफत बूस्टर डोस, 30 सप्टेंबरपर्यंत सरकारी केंद्रांवर सुविधा, सुरक्षाकवचामुळे भारत आरोग्यदायी बनेल, पंतप्रधान मोदींना विश्वास


3. 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय, ओबीसींना दिलासा


4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज ठाकरेंची भेट घेणार, नवीन सत्ता स्थापनेनंतरच्या ह्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लक्ष... 


Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता दोघांची भेट होईल. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता दादर इथल्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतील. भाजप आणि शिंदे गटाचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची प्रथमच भेट होणार आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज सकाळी वाजता या दोघांची भेट होणार आहे.


5. नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला, आता खरंच एकदम ओके वाटतंय; मध्यरात्रीच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा निशाणा


6. राज्यात मुसळधार पावसामुळे 99 जणांचा मृत्यू, 180 जनावरंही दगावली तर पालघरसह पुणे, सातारा, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी


7. मुंबई- अहमदाबाद महामार्ग बंद, नवसारी, चिखलीत पूर आल्यानं वाहतूक ठप्प,  गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दोन्ही राज्याचे पोलीस तैनात


8. अकोल्याच्या झुरळ खुर्द गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेऊन दाखल, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग 


9. देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, केरळच्या कोल्लममधील रुग्णाच्या संपर्कात 11 जण, आरोग्य यंत्रणा अलर्ट


10. भारतीय फलंदाजी ढासळली, 100 धावांनी इंग्लंड विजयी, मालिका 1-1 ने बरोबरीत, रीस टॉपलेच्या सहा विकेट्स