दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहूतील शिळा मंदिराचं लोकार्पण, आज मुंबईतल्या कार्यक्रमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) हे आज (14 जून) देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूत तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मात्र, हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
2. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा, मुंबई, ठाणे, नाशकातून स्पेशल ट्रेननं शिवसैनिक अयोध्येला रवाना, तयारीसाठी संजय राऊतांसह दिग्गजांची फळी आधीच दाखल
3. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस, तब्येतीच्या कारणास्तव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नाहीत. मात्र राज्यभर मनसैनिकांकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज (14 जून) 54 वा वाढदिवस आहे. मात्र तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. "माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही," असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
4. विधान परिषदेसाठी निवडणूक होणार, मविआ आणि भाजपची माघार नाहीच, दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात लढत
5. मुंबईत कोरोनाचे बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंट्सचे 4 नवे रुग्ण; अकरा वर्षांच्या दोन मुलींनाही नव्या व्हेरियंटची लागण
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 14 जून 2022 : मंगळवार : एबीपी माझा
6. सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजना आणि 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आज मंजुरी मिळण्याची शक्यता, आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
7. काँग्रेस खासदार राहुल गांधींची आज सलग दुसऱ्या दिवशी ईडी चौकशी होणार, नॅशनल हेराल्ड प्रकरणी काल तब्बल दहा तास राहुल गांधींची चौकशी
8. अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरची जामिनावर सुटका, पार्टीत ड्रग्जसेवन केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर बंगळुरु पोलिसांनी केली होती अटक
9. भारत- दक्षिण आफिकेदरम्यान आज विशाखापट्टणममध्ये तिसरा टी-20 सामना, मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय आवश्यक
10. आयपीएल प्रक्षेपण हक्कांच्या ई-लिलावात बीसीसीआयचं उखळ 44 हजार कोटींनी पांढरं; पुढच्या पाच वर्षांसाठी एका सामन्याच्या टीव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी मिळून 107 कोटींची बोली