1. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आजपासून घरोघरी तिरंगा अभियानाला सुरुवात, सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, प्रसिद्ध ठिकाणी तिरंग्याची रोषणाई
2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा, अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार
3. मार्मिकच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे साधणार ऑनलाईन संवाद, शिंदे गटाच्या प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या निर्णयावर फटकाऱ्यांची शक्यता
4. उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख उल्लेख करत ट्वीट केलेला व्हीडिओ संजय शिरसाटांकडून डिलीट, मंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे गटाला इशारा दिल्याची चर्चा,
5. प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक, रश्दींवर रुग्णालयात उपचार
6. पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत.
7.राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार
8. जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवाद्याला अटक; नुपूर शर्मांना मारण्याची होती तयारी, पोलिसांचा दावा
9.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात मधू प्रकाश पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, आज अंत्यसंस्कार
10. अभिनेता रणवीर सिंहच्या घरी पोलिसांची नोटीस, न्यूड फोटोसेशन प्रकरणी 22 तारखेला चौकशीसाठी समन्स