दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पुढील 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर उर्वरित महाराष्ट्रात पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, शेतीकामांना लगबग
Maharashtra Rain News : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री झालेल्या वादळी पावसामुळं अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील झाल्या आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडं उन्मळून पडली असून, वीजेचं खांब देखील पडले आहेत. राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
2. पुलवामामध्ये लष्कराला मोठं यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहिम सुरु
3. देहूतील संत तुकाराम महाराजांचं मंदिर आजपासून बंद, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय तर पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन
4. मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामं
5. आता विधान परिषदेतही बाजी मारणार, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना खुलं आव्हान तर राज्यसभेतील पराभवानंतर वर्षावर शिवसेनेची चिंतन बैठक
6. राज्यात शनिवारी 2922 रुग्णांची नोंद तर 1392 रुग्ण कोरोनामुक्त, कोरोना रुग्ण वाढत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन
7. राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींकडून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह 22 नेत्यांना पत्र, 15 जूनला दिल्लीत बैठक
8.सोनिया-राहुल गांधींना ED च्या नोटीस विरोधात काँग्रेसची देशभरात पत्रकार परिषद, निदर्शनाचीही तयारी
9. अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता साडेतीन, कोणतंही नुकसान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती
10. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी-सामना आज कटकमध्ये, मालिकेत पुनरागमनाचा टीम इंडियाचा निर्धार, गोलंदाजीत सुधारणेकडे लक्ष्य