1. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद, चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, आत्मघातकी हल्ल्याचा कट उघडकीस


2. जालना-स्टील कंपनीच्या मालकाच्या घरी-कार्यालयावर आयकरचे छापे, 390 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश, 58 कोटींची रोख, 32 किलो सोनं जप्त


राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे.


3. आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, तर लक्ष्मी बँकेवरचे निर्बंध तीन महिन्यांनी वाढवले, ठेवीदारांची चिंता वाढली


4. अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठानंतर नागपूर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या चारही जिल्ह्यातील परीक्षा रद्द, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, आजही जोर कायम राहणार


राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे.


5. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, सरकारनं तोंडाला पानं पुसल्याची अजित पवारांची टीका


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 11 ऑगस्ट 2022 : गुरुवार : एबीपी माझा


6. एकमेकांना सांभाळून घ्या, नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना, खातेवाटपाबाबत नव्या मंत्र्यांनाकडूनच पर्याय मागवण्यात आल्याची चर्चा


7. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान नाही, शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दादा भुसेंना स्थान


8. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता थेट 22 ऑगस्टला सुनावणी, दहा दिवसांनी सुनावणी लांबल्यामुळे धाकधुक वाढली 


9. देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह, तर समुद्राला नारळ अर्पण करून लवकर मासेमारीला होणार सुरुवात


10. अभिनेता मुकेश खन्नांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, मुलींबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पश्चाताप नाही, मुकेश खन्नांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता