दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. काल 17 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीकडून उशीरा रात्री अटक, पत्राचाळ प्रकरणी कारवाई, आज न्यायालयात हजर करणार


Sanjay Raut Arrest  : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल  दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.


2. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई, शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल, तर ईडी कारवाईच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी आंदोलन


3. व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणीही राऊतांचा पाय खोलात, स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर वाकोला पोलीस ठाण्यात दुन्हा, 


4. शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकराच्या अंगणात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा,   बाईक रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली..


5.'राजभवनात बसून सरकार पाडणे, काड्या घालणे योग्य नाही'; सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर हल्लाबोल


6. काँग्रेस नेते अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, मोहित कंबोज यांच्या मध्यस्थीनं खलबतं, मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत भेट घेतल्याची अस्लम यांची माहिती..


7. पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त शिवमंदिरांत बम बम भोलेचा गजर, घरबसल्या प्रसिद्ध शिवमंदिरातील भोलेनाथाचं दर्शन एबीपी माझावर


8. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला केंद्राकडून मंजुरीची शक्यता


9. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्ण, तर भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानला चारली धूळ, हॉकी संघाचाही घानावर विजय


10. आज भारत-वेस्ट इंडिजदरम्यान दुसरा टी 20 सामना, टीम इंडिया आघाडी घेण्याच्या प्रयत्नात