दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 14 पिकांच्या हमीभावात वाढ, तांदूळ, तूर, मूग, सूर्यफूल आणि शेंगदाण्याचा समावेश


2. औरंगाबाद विमानतळाचं नाव संभाजीनगर करून दाखवा, नामांतराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रतिआव्हान, बाबरीबाबत फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरुनही चॅलेंज


3. भाजप विधान परिषदेत सहावा उमेदवार उतरवणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती हर्षवर्धन पाटील, सदाभाऊ खोतांच्या नावाची चर्चा


4. राज्यसभेच्या निवडणुकांचं काऊंटडाऊन सुरु, मतदानाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांच्या खांद्यावर, हॉटेलमधल्या बैठकांचा सिलसिला सुरुच


5. कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांची आडकाठी, राजापुरातील शिवणे खुर्द गावात रात्रभर ठिय्या, विश्वासात न घेता काम सुरु केल्यामुळं गावकऱ्यांचा संताप


6. मुंबईत आजपासून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती, नियमाचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड, तीन महिन्यांसाठी वाहन परवानाही रद्द होणार


Mumbai Helmet For Pillion Riders : मुंबईकर बाईक चालकांना आजपासून हेल्मेट घालावंच लागणार आहे. ते ही केवळ बाईक चालकाला नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तिलाही. आजपासून मुंबईत बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक आहे, नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करायला तयार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत नोटीस जारी केली होती. त्यानुसार आज 9 जूनपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे.


वाहतूक अधिकारी आजपासून प्रत्येक जंक्शन आणि रस्त्यावर मोटारसायकलवर हेल्मेटशिवाय बसणाऱ्या दोघांवर कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता मोटरसायकलवर बसणाऱ्या दोघांसाठी हेल्मेट सक्तीचे झाले आहे. ई-चलानद्वारेही दंड आकारला जाणार आहे. तसंच हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे 50 वाहतूक पोलीस चौक्या सतर्क राहणार आहेत..


7. मुंबईतील वांद्र्याच्या शास्त्रीनगरमधील दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी, भाभा रुग्णालयात उपचार सुरु


8. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून पाच पक्षप्रमुखांना समन्स, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवलेंना 30 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार


9. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गर्भपातांवरुन नीलम गोऱ्हे आक्रमक; प्रशासनाला दिले निर्देश 


10.आजपासून भारत दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला सुरुवात, रिषभ पंत कप्तान तर हार्दिक पांड्या उपकप्तान, दुखापतीमुळं लोकेश राहुल संघाबाहेर