1. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेच, विधिमंडळ सचिवालयाच्या पत्रानं ठाकरेंना धक्का, प्रतोदपदी सुनील प्रभूंऐवजी भरत गोगावले, व्हिप मोडणाऱ्या १६ आमदारांवर कारवाईची शक्यता


2. विधानसभा अध्यक्षपदाची परीक्षा पास केल्यानंतर आज शिंदे सरकारची बहुमत चाचणीची कसोटी, मोठ्या फरकानं विजयाचा फडणवीसांचा विश्वास


Maharashtra Politics : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज परीक्षा आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाईत तर जिंकली आहे. आता उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांची खरी परीक्षा आहे. 


3. मध्यावधीसाठी तयार राहा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी आमदारांना सूचना दिल्याची माहिती, मंत्रिमंडळ वाटपानंतर शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर येण्याचं भाकीत


4राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? त्यांचा न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला?  'सामना'तून हल्लाबोल


5. नव्या सरकारमधल्या खातेवाटपासाठी आज महत्त्वाची बैठक, कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता, संध्याकाळी भाजप आणि शिंदे गटाची खलबतं


6. प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाच्या मृत्यूनं नागपुरात खळबळ, स्टॅमिना वाढवण्यासाठी गोळ्यांच्या अतिसेवनामुळं मृत्यू झाल्याचा संशय


7. आठवडाभर आधीच विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडमध्ये; यंदा विक्रमी यात्रा भरणार, आषाढीपूर्वीच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला, पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे


8. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं पटकावला 'मिस इंडिया 2022'चा बहुमान, अंतिम फेरीत 31 स्पर्धकांना हरवत बाजी
 
9. सिराज-बुमराहचा भेदक मारा, पुजाराचं अर्धशतक, भारताकडे 257 धावांची आघाडी


10. महिला हॉकी विश्वचषकातील भारत- इंग्लंडमधील सामना अनिर्णित, वंदना कटारियाने केला एकमेव गोल