दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदान, भाजपच्या मुरजी पटेलांनी उमेदवारी मागे घेतली तर ठाकरे गटाच्या लटकेंविरोधात 7 उमेदवार रिंगणात
राजकीय घडामोडींनी गाजलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान आज होतंय. शिवसेनेतील फुटीनंतर आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवल्यानंतर मशाल या निशाणीसह ठाकरे गट प्रथमच निवडणूक लढवतोय. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात ७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर या निवडणुकीतील चूरस कमी झाली. एकतर्फी वाटणाऱ्य़ा या निवडणुकीत सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. नव्या चिन्हासह ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय.
2. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेची शक्यता
देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत गुजरातची निवडणूक जाहीर होणार आहे.
3. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस, टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास भिडेंचा नकार
4. घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या रवी राणांना बच्चू कडूंचं प्रतिआव्हान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही राणा-कडूंमधला वाद कायम
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता, धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारणार, राणांचं विधान, तर रवी राणांनी मारायला यावं, कडूंचं प्रतिआव्हान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही राणा-कडूंमधला वाद कायम
5. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 40 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 4 हजार 700 कोटी, सोलार प्रकल्पासाठी जमिनी भाडेपट्ट्यानं घेणार, शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय
6. एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजाला वार्षिक 60 हजार निर्वाह भत्ता, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
7. आदित्य ठाकरे सत्तारांचा मतदारसंघ सिल्लोडच्या दौऱ्यावर असतानाच श्रीकांत शिंदेंची सभा, तर आदित्य ठाकरेंकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांना आमनेसामने चर्चेचं आव्हान
8. 20 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर भेटण्याची शक्यता, यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांचा युतीबाबत ठाकरेंना प्रस्ताव
9. छप्परतोड डान्सनंतर गौतमी पाटीलचा माफीनामा, सांगलीतल्या कार्यक्रमानंतर मी सुधारणा करत असल्याचं गौतमीचं स्पष्टीकरण
10. टीम इंडियाची बांगलादेशवर सनसनाटी मात, सेमीफायनल्समध्ये एन्ट्री; आज ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या रिंगणात दक्षिण अफ्रीकाशी पाकिस्तान भिडणार