दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. नव्या वर्षात राज्यात निर्बंधमुक्तीची गुढी, लोकल प्रवासावरील निर्बंधही हटवले, देवाचरणी माथा टेकवणंही शक्य, राज्य संपूर्ण निर्बंधमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय


आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधपासन मुक्तता मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील. 


महत्त्वाची बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन करण्यात आले आहे. 


2. आजपासून नवे आर्थिक बदल, क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर, औषधंही महागणार, तर मेट्रो सेसमुळे नव्या घरांच्या किंमतीतही वाढ


3. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई होणार, बडतर्फीसह सेवासमाप्तीचीही शक्यता, एसटीत 11 हजार कंत्राटी कामगारांची भरती करणार


4. नव्या वर्षात घराचं स्वप्न पूर्ण होणार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरांची लॉटरी


5. राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ, मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये दर अधिक, आजपासून घर खरेदी महागणार


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 एप्रिल 2022 : शुक्रवार



6. पुण्यात आजपासून 4 वर्षांपुढील सर्वांना हेल्मेटसक्ती, शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालय परिसरातल्या रस्त्यांवर हेल्मेट बंधनकारक 


7. छत्रपती संभाजीराजे यांची आज पुण्यतिथी, वढू, तुळापूर गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन, मंत्र्यांसह विविध पक्षाचे नेते अभिवादन करणार


8. अनिल देशमुख आणि सचिन वाझे आता सीबीआयच्या ताब्यात, कारागृहातील चौकशीत योग्य ती माहिती न दिल्याने ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचं सीबीआयचं स्पष्टीकरण


9. काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलावर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या महिलेला अटक, महिलेचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध


10. लखनौचा सुपर विजय, चेन्नईचा सहा गड्यांनी पराभव,  आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा काल पहिलाच विजय