मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानात (रेशनिंग दुकान) आता 35 रुपये प्रति किलोने मिळणार आहे. सध्या या दुकानांमधून 55 रुपयांना प्रति किलो तूरडाळ विकली जात आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय झाला असून, पणनमंत्री सुभाष देशमुखांनी याची माहिती दिली.
या निर्णयामुळे या हंगामात खरेदी केलेली व पुढील कालावधीत खरेदी करावयाच्या तूर साठवणुकीसाठी गोदामे रिकामी होण्यास मदत होईल, असा दावा पणनमंत्र्यांनी केला आहे.
त्याचबरोबर, शासनाचे ज्या विभागात त्यांचे अंतर्गत असलेले सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्थाद्वारे तूरडाळीची खरेदी पुढील आदेश होईपर्यंत फक्त राज्य पणन महासंघाकडूनच शासकीय दराने तूर डाळ खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.