विदर्भ, मराठवाड्यात 15 जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2017 04:45 PM (IST)
मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकड़ून तयारीही पूर्ण झाली आहे. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये 1456 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यात उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. औरंगाबादमध्ये 62 जिल्हा परिषद गटांसाठी तर पंचायत समितीच्या 124 गटांसाठी मतदान होईल. नांदेडमध्येही जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 17 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तिकडे उस्मानाबादमध्येही मतदानासाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. संबंधित बातम्या: जालन्यात क्रूझरमध्ये 5 लाख 96 हजार रुपयांची रोकड नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या घरावर हल्ला