पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन कार्यकर्ते आणि उमेदवारांना सोशल मीडियाचं महत्त्व पटवून दिलं. विरोधकांनी आपल्याविरोधात सोशल मीडियावर लिहिल्यास, त्यांना काऊंटर अटॅक करण्याचा आदेश अजित पवारांनी दिला.
“जेवढा सोशल मीडियाचा वापर करु, तेवढा आपल्याला वातावरण निर्मिती करता येईल. विरोधकांनी आपल्याला अडचणीत आणणारं काही सोशल मीडियावर पाठवलं, तर लगेच त्याला काऊंटर अटॅक झाला पाहिजे.”, असा अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते आणि उमेदवारांना आदेश दिला.
लोकसभा-विधानसभेत भाजपने सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका लावत सत्ता काबीज केली. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियाची धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
“माध्यमांवर माझा आणि शरद पवार साहेबांचा चेहरा दिसला म्हणजे तीच राष्ट्रवादी आणि तेच घड्याळ समजा. असं म्हणत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार हेच दोन चेहरे असल्याचं स्पष्ट केलं.
गुंडाना निवडून आणू आणि मग सुधारू असं म्हणताना भाजप मंत्र्यांना लाज वाटली नाही का? गुंड निवडून आल्यानंतर कधी सुधारतील का? असे प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा मंत्री सुभाष देशमुखांसह भाजपावर हल्ला चढवला.