Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून कोर्टात सुनावणी सुरू होती.


नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या अडचणी कायम आहेत. आजचा युक्तिवाद संपला असून, उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे. आता उद्याच समजेल की नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलीय. नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस चिकटवली आहे. नितेश राणे कुठे आहेत हे सांगणार नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी राणेंना पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. याशिवाय नारायण राणेंची पत्रकार परिषदेतील वक्तव्यं कोर्टात सादर करण्यात आली आहेत.


दरम्यान, कोर्टातील सरकारी वकिलांचा आजचा युक्तीवाद संपला आहे. याप्रकरणी  तीन तास सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. तसेच यावेळी त्यांनी  नितेश राणेंचे वकिल संग्राम देसाई यांचे मुद्दे खोडून काढले. नितेश राणे हे पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली. याप्रकणी सरकारी वकील हे वेळ काढण्याचे काम करत असल्याचा आरोप नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत, आमच्याविरोधात तक्रार का केली नाही? असा सवालही नितेश राणेंच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणात नितेशला अडकवण्याचा खोटा प्रयत्न केला जात आहे. सरकारी वकिलांनी जो युक्तीवाद केला, त्यामधील मुद्दे खोडून काढल्याचे यावेळी नितेश राणेंचे वकिल देसाई यांनी सांगितले.


सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. संतोष परब यांच्या बाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.


महत्त्वाच्या बातम्या: