जळगाव : भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसेंचा पदभार कमी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र असं असताना जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. कारण खडसेंच्या समर्थनात जळगावमधील भाजपचे 15 नगरसेवक उद्या राजीनामा देणार आहेत.

 

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे नगरसेवक उद्या आपला राजीनामा देतील. गेल्या 15 दिवसांमध्ये एकामोगामाग एक आरोप होत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं अशी बातमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावमधून खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.

 

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे उद्या राजीनामे देण्याचा निर्णय 15 नगरसेवकांनी घेतला असून, या संबंधी या नगरसेवकांनी आज जळगाव येथे  बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावेळी नगरसेवकांनी अंजली दमानिया यांचाही निषेध त्यांनी केला.

 

त्यामुळे राजीनाम्याच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपचं नेतृत्व काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्वाचं आहे.