टोलवसुलीला पुन्हा सुरुवात, टोलनाक्यावर मोठ्या रांगा
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2016 07:39 AM (IST)
मुंबई : राज्यासह देशभरात आजपासून पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाली आहे. नोटाबंदीनंतर सरकारने 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केली होती. मात्र ही मुदत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपल्याने आज टोलनाक्यावर पुन्हा वसुलीला सुरुवात झाली आहे. वसुलीमुळे टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या वर टोल असल्यास 500 ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र यामध्ये काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोलनाक्यावर 15 डिसेंबरपर्यंत जुनी नोट देता येणार आहे.