कुठलीही गोष्ट मला वारसा हक्कानं मिळालेली नाही: धनंजय मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2016 12:14 AM (IST)
बीड: 'कुठलीही गोष्ट मला वारसा हक्कानं मिळालेली नाही. तर ती संघर्षानं मिळवली आहे.' असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. आज ते परळीत बोलत होते. नगरपालिका निवडणुकीतील यशाबद्दल बोलताना धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेवर जोरदार टीका केली. 'बीड जिल्ह्यात भाजपने फक्त परळीत युती केली. तरीही त्यांच्या पदरी अपयश आलं. पण तरीही परळीच्या विकासात आडवे येणाऱ्यांना जनतेनंच आडवं केलं. मुंडे साहेबांचा खरा वारसा जनतेनं निवडून देऊन माझ्या हाती दिला.' असंही धनंजय मुंडे म्हणाले. 'आम्ही बंडखोर आम्ही पाठीत खंजीर खुपसलं असे आरोप आमच्यावर केले. अशी खंत शेवटपर्यंत अण्णांच्या मनात राहिली.' असं म्हणत धनंजय मुंडे फारच भावूक झाले आणि त्यांना आपले अश्रूही अनावर झाले.