मुंबई :  आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, आज सुनावणीची शक्यता


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याची तसेच मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेतून राज ठाकरे यांच्यावर करण्यात आलाय. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे


कोरेगाव भीमा प्रकरणी फडणवीस सरकार संशयाच्या भोवऱ्यात


कोरेगाव भीमा घटनेला तत्कालीन सरकार जबाबदार होते असा गंभीर आरोप तत्कालीन फडणवीस सरकार वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. काल भीमा कोरेगाव आयोगासमोरं शरद पवार यांनी जबाब देताना सदर बाब नमूद केली आहे. तसेच ही संपुर्ण घटना वेळीच थांबवता आली असती. परंतु, तत्कालीन सरकारनं तसं केलं नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता तत्कालीन फडणवीस सरकार संशयाच्या भोवऱ्यात येऊन उभं राहिलं आहे


राणा दाम्पत्याचा मुंबईतला मुक्काम वाढणार? 


भायखळा कारागृहात प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याचा आरोप करण्यात येतोय. नवनीत राणा यांची आज कारागृहातून सुटका झाली. मात्र, नवनीत राणा यांची तब्येत खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलंय. त्यामुळे,
जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत राणा दांपत्य मुंबईतच थांबणार आहे 


मुंबईतील 26/11 हल्ल्याचा दहशतवादी कसाबला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली  


तब्बल चार वर्षांनंतर 26/11 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल आमीर कसाब याला आज पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. 'ऑपरेशन एक्स' अंतर्गत कसाबच्या फाशीची शिक्षा पूर्ण झाली. 6 मे 2010 रोजी  कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती


हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातील चार संशयित दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन उजेडात


हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातील चार संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. या चारही संशयितांचं नांदेड कनेक्शन असल्याचं उघड झालंय या चौघांना नांदेड जिल्ह्यात येण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.


केदरनाथचे  दरवाजे आज भाविकांसाठी खुले होणार


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, पंचकेदार व छोटा धाम या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी केदारनाथ एक मानले जाते. बाबा केदारनाथ (Kedarnath) मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर सोमवारी पहाटे 6.15 वाजता उघडणार आहे. 


योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर आहे. अयोध्येमध्ये  हनुमानगढी आणि राममंदिराला भेट देणार आहेत


मुंबई आत्मसन्मानासाठी खेळणार, गुजरातसोबत लढत


GT vs MI : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर तळाशी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचे (Gujrat Titans vs Mumbai Indians) आव्हान असणार आहे. मुंबई गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी 9 पैकी तब्बल 8 सामने गमावले आहेत. तर गुजरातने मात्र 10 पैकी 8 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असली तरी मागील सामन्यात पंजाबने त्यांना मात दिली. दुसरीकडे मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यात दमदार राजस्थान संघाला मात दिली. त्यामुळे गुजरातला आज मुंबईचं आव्हान अवघड पडू शकतं.


आज इतिहासात



  • 1589 - गायक तानसेन यांचे निधन

  • 1861 - मोतीलाल नेहरू यांचा जन्म

  • 1944 - महात्मा गांधी यांची पुण्यातील आगाखान पॅलेसमधून सुटका झाली. हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा तुरुंगवास होता