Todays Headline 30th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील सैनिक लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर उपस्थित रहाणार आहेत.


गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची पाहणी करणार


चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतीत स्फोटके भरण्याचे काम मध्यरात्री सुरु होणार आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी करणार आहेत


काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज  दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार


काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज  दिग्विजय सिंग, शशी थरुर नामांकन अर्ज भरणार आहे. आज काँग्रेसच्या ध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.  17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे.


  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहे. 'मी वसंतराव देशपांडे' या सिनेमासाठी राहुल देशपांडेला सर्वोत्कृष्ट गायक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आगे. तर 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' साठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. जून सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला विशेष ज्युरी पुरस्कार मिळेल. अजय देवगणला तान्हाजी सिनेमासाठी  पुरस्कार जाहीर झालाय. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
 


 पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर


 पंतप्रधान मोदी गांधीनगर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे.