Kirit Somaiya : महाविकास आघडीचे आणखी  काही नेते ईडीच्या रडारवर असल्याचे अनेकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होणार आणि त्या भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचाराचा स्मारक ग्रीन स्ट्रीट रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाची सुरुवात होणार असा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या आज डोंबिवलीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नवरात्र उत्सवात भेट देण्यासाठी आले होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी देवीची पूजा केली .
 
त्यांना शेख चिल्लीचे स्वप्न बघून द्या - किरीट सोमय्या यांचा राष्ट्रवादीला टोला

शरद पवार हे जेव्हा महाराष्ट्रात दौरा करतात त्या दौऱ्या नंतर राज्यात सतत बदल होतो, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. याला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर देत सत्तेशिवाय राष्ट्रवादीच्या  नेत्यांना चैन पडत नाही, त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे फक्त पैसे मोजायचं काम आहे, यावेळी  भ्रष्टाचारी लोकांना दूर करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाले, आता महाराष्ट्र खऱ्या अर्थात लोकशाही आणि विकासाचा दृष्टीने पुढे चालला आहे. त्यांना शेख चिल्लीचे स्वप्न बघून द्या असा टोला सुप्रिया सुळे यांना लगवला.


ज्याच्याकडे बहुमत त्यांच्या बाजूने निर्णय, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळणार - किरीट सोमय्या
न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणूक आयोग पण आता न्यायालयाच्या भूमिकेत आहे. स्पष्टपणे मागचं निवडणूक आयोगाचे कार्यपद्धती पाहिली तर ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्या बाजूने निर्णय होतो, ज्याच्याकडे  बहुमत असेल तो सगळ्यात जास्त खरा आणि इमानदार पक्ष ,बहुमत  एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, त्यामुळे सत्याचाच विजय होणार, असे किरीट सोमय्या म्हणाले. 
 
संजय पांडे कुठे आहेत ते लक्षात ठेवा - किरीट सोमय्या यांची पोलिसांना तंबी

गेल्या काही महिन्यांमध्ये कल्याण डोंबिवलीत दोन भाजपा कार्यकर्त्यांसोबत मारहाणीचा प्रकार घडले आहेत. याबाबत आज भाजपचे शिष्ट मंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांना सांगू इच्छितो , बदल्या ट्रान्स्फरसाठी लाखो रुपये खर्च केले होते ना , आता ते राज्य संपलेले आहे, जनतेची सेवा करा,पुन्हा एकदा तीच माफियागिरी करू नका, संजय पांडे कुठे आहेत ते लक्षात ठेवा, कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्या, स्वतःच बँक अकाऊंट काही काळ विसरा असा इशारा सोमय्या यांनी दिला.