Todays Headline 26th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


तळेगावात भाजपचं आंदोलन 


पुण्यातील तळेगावात आदित्य ठाकरे यांचे जिथे आंदोलन झाले त्याच ठिकाणी आज भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मावळचे माजी आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे उपस्थित राहणार आहेत.फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाविकास आघाडीमुळे गुजरातला गेल्याच्या आरोपातून सकाळी दहा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
'साई रिसॉर्ट'आज हायकोर्टात सुनावणी
दापोलीतील बहुचर्चित 'साई रिसॉर्ट'आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 
 
अंबाबाई देवीच्या पेड ई पासला विरोध करणाऱ्या याचिकेवर सुनावणी 


अंबाबाई देवीच्या पेड ई पासला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे. 
 
शिवसैनिकांच्या पदयात्रेला सुरूवात 


शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील शिवसैनिक नगर ते मुंबई ९ दिवस पदयात्रा करणार आहेत. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही पदयात्रा निघणार आहे. २०० ते २५० शिवसैनिक मुंबई येथे ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यात पदयात्रेने सहभागी होणार आहेत.
 
अगस्ती साखर कारखाना निवडणूक मतमोजणी
अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज होणार आहे. कारखाना स्थापनेपासून ताब्यात असलेली सत्ता टिकविण्याचं मोठं आव्हान पिचड पिता पुत्रांसमोर आहे.
 
सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याची राहुरी पोलिस चौकशी करणार
मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीनं नाव घेतलेला सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याला राहुरी पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावलं आहे. 


राष्ट्रपती कर्नाटकच्या दौऱ्यावर 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 28 सप्टेंबरपर्यंत कर्नाटकचा दौरा करणार आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच राज्य दौरा असेल. राष्ट्रपती आज म्हैसूरच्या चामुंडी हिल्स येथे म्हैसूर दसरा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 


खंडणी प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला आज कोर्टात समन्स
सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आज पटियाला हाऊस कोर्टात हजर होऊ शकते.


काँग्रेसची पत्रकार परिषद
काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते शक्ती सिंह गोहिल आज दुपारी 12 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.