मुंबई : आरबीआयकडून (RBI) मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (malkapur urban cooperative bank) व्यवहारावरील निर्बंध आणखी तीन महिने वाढवले आहेत. आरबीआयनं आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कलम 35 अ च्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारांचा वापर करत बॅंकेला आर्थिक स्थिती सुधारण्यास सांगितले. मात्र आर्थिक स्थिती न स्थिरावल्यानं बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 56 अंतर्गत 24 नोव्हेंबर 2021 पासून बॅंकेचा व्यवसाय बंद आहे.  बॅंकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी वेळ देण्यात येत आहे, ज्यात पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश देण्यात आले आहे. 


दरम्यान, बॅंकेवर निर्बंध जरी असले तरी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे निर्बंधांसोबत बॅंक व्यवहार करु शकते. मात्र ज्यात ठेवी काढणे किंवा स्विकारण्यावर बॅंकेला मर्यादा आहे


24 नोव्हेंबर 2021 रोजी काय होते बॅंकेवर निर्बंध? 


बॅंकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने ग्राहकांना खात्यातून दहा हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सेव्हिंग आणि करन्ट खात्यांसाठी निर्णय लागू करण्यात आला आहे. रिझर्व बॅंकेकडून पुढील सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आल.  मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही.  कोणतीही गुंतवणूक नाही करणार, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहे.  


बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध नाही किंवा बॅंकेचे लायसन्स रद्द केले असे देखील नाही. मात्र बॅंकेने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आरबीआयने स्पष्ट निर्देश दिले आहेत. या अगोदर  देखील बॅंकेला केवायसी संदर्भात दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मलकापूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बॅंक ही एक हजार कोटी रुपयांची ठेवी असणारी बॅंक आहे. भाजपचे चैनसुख संचेती बॅंकेच्या अध्यक्षपदी आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मुर्तिजापूर अशा अनेक ठिकाणी बॅंकेचं प्रस्थ आहे.