मुंबई :  ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 


8 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली.  या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला.  द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता.  मुर्मू विजयी झाल्यातर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील.  सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.


 ईडी कारवाई विरोधात कॉग्रेसचं राज्यभर आंदोलन


   सोनिया गांधीना आज ईडी समोर हजर होणार आहे.   सोनिया गांधी सकाळी 11.30 वाजता घरातून निघणार आहेत.  केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंग सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही


आदित्य ठाकरे  यांची शिवसंवाद यात्रा


सत्ता संघार्षानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा मुंबई बाहेर जाणार आहे. 21 ते 23 जुलै दरम्यान शिवसंवाद यात्रा भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी अशी असणार आहे. आज भिवंडीत यात्रा असणार आहे. आज भिवंडी आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता इगतपुरी येथे मेळावा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता नाशिकमध्ये मेळावा होणार आहे


श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती राष्ट्रपती पदाची शपथ घेणार


श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे आज सकाळी 10 वाजता पुन्हा राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत