मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत. 


शिवसेना नेते आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आज होणाऱ्या निष्ठा यात्रेला सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून निघणाऱ्या रॅलीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गवळी तिठ्या जवळ शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांचं घर आहे. केसरकर यांच्या घरा समोरून आदित्य ठाकरे यांची रॅली जाणार होती. मात्र पोलिसांनी या र्रलीला परवानगी नाकारली आहे. 


संजय राऊतांवर ईडीची कारवाई
शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने काही मोजकेच नेते भूमिका मांडत होते. त्यापैकी संजय राऊत एक आहेत. पण आता संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर मात्र शिनसेनेची कठोरपणे भूमिका मांडणाऱ्या नेत्यांची संख्या कमी झालीय. त्यातच ज्यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे ते काही नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. मात्र, शिंदे गटाच्या आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे परिवार एकटा पडलाय का? यावर शिवसेच्या वरिष्ठ नेत्यांची रिॲक्शन. 


संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी गुन्हा दाखल
शिवसेना नेते आणि खासदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना काही तासांपूर्वी ईडीने ताब्यात घेतले आहे. आता त्यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.


संजय राऊतांच्या कारवाईवर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे मात्र अद्याप या प्रकरणात भाजपचे प्रमुख नेत्यांनी मौन बाळगले आहे. यावर उद्या भाजप काय प्रतिक्रिया देते हे महत्त्वाचं आहे 


विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नामकरण वाद
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी छात्रभारतीसह समविचारी विद्यार्थी संघटनांना चर्चेसाठी बोलविले आहे. सावरकरांचं नाव दिल्यानंतर या विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. त्यानंतर कुलगुरूंनी या चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना बोलवले आहे, फोर्ट कॅम्पस, सकाळी साडे अकरा वाजता आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आहे. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे मुंबईतील १०० महाविद्यालयांत मनविसे युनिटचा उद्घाटन सप्ताह होणार आहेत. आज मुंबईतील नामांकित रुईया महाविद्यालयात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, सकाळी ११ वाजता-  वेदांत


शिवसैनिकांचे आंदोलन
राज्यपालांनी मुंबईबाबात केलेल्या वक्तव्या विरोधात आणि ईडीविरोधात राज्यभर शिवसैनिक आंदोलन करणार आहेत.


लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा  
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात महागाई आणि काही वस्तूंवरील जीएसटी यावरून गदारोळ झाला. सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोललेल्या आक्षेपार्ह शब्दांवर सरकार आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईच्या मुद्द्यावर आज लोकसभेत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या आजच्या कामकाजाच्या यादीत नियम 193 अन्वये वाढत्या किमतींची चर्चाही करण्यात आली आहे. 


भारत-वेस्टइंडीज सामना
भारत आणि वेस्टइंडीजमध्ये आज दुसला टी20 सामना आहे. पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली असून आता उद्याचा देखील सामाना जिंकण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.