LIVE UPDATES | रायडींग करताना संतुलन बिघडून अपघात रायडरचा जागीच मृत्यू

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2020 11:52 PM
अंबरनाथ - 'वालधुनी'च्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची राज्य सरकारकडे मागणी
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील लाहेफाट्याजवळ रायटिंग करत असताना भिवंडीतील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शाहीर हुसेन शेख वय वर्ष 35 असे तरुणाचे नाव असून त्याला रायडिंगची खूप आवड होती. त्यासाठी त्याने आठ लाखाची स्पोर्ट बाईक देखील विकत घेतली होती. रायडिंग करण्यासाठी शाहीर आपल्या मित्रांसोबत कासाऱ्याच्या दिशेने जात होते. मात्रस तेथून परत येत असताना शाहीर याचा बाईकवरील संतुलन बिघडल्याने बाईक थेट टँकरला जाऊन आदळली. त्यात शाहीरचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी चालक शाहीरच्या विरोधात 304 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास करत आहे.
पुणे : भारनियमनाने कंबरडे मोडलेल्या विजेने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का दिलाय. विद्युत प्रवाहाच्या तारांमधील घर्षणामुळे लागलेल्या आगीत तब्बल साडेबारा एकर ऊस पुन्हा एकदा पेटलाय. मंचरच्या लोंढेमळा येथे ही घटना आज सायंकाळी घडली. यात तेरा शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. आधीच भारनियमनामुळं आठ तास अंधारात काढावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना या विजेने हा मोठा धक्का दिलाय. असा आरोप करत शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केलीये. गेल्या महिन्यात 15 जानेवारीला आंबेगाव तालुक्यातीलच चांडोली बुद्रुकमध्ये चौदा एकर ऊस पेटला होता. तेव्हा आगीचे कारण पुढे आले नव्हते पण नुकसान झालेले शेतकरी महावितरणाकडेच बोट दाखवत होते. तेव्हा शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्यापूर्वीच महावितरण विभागाने खाली लोंबणाऱ्या विजेच्या तारांचा बंदोबस्त लावायला हवा.
बीड : परळीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आढळले. आठ दिवसांपूर्वी या अर्भकाचा जन्म झाला असण्याची शक्यता आहे. स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ठेवून पसार झाले होते.
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील लाहेफाट्याजवळ रायटिंग करत असताना भिवंडीतील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शाहीर हुसेन शेख वय वर्ष 35 असे तरुणाचे नाव असून त्याला रायडिंग ची खूप आवड होती त्यासाठी त्याने आठ लाखाची स्पोर्ट बाईक देखिल विकत घेतली होती व रायडिंग करण्यासाठी शाहीर आपल्या मित्रांसोबत कासाऱ्याच्या दिशेने जात होते मात्र तेथून परत येत असताना शाहीर याचा बाईक वरील संतुलन बिघडल्याने बाईक थेट टँकरला जाऊन आदळली व शाहीर चा जागीच मृत्यू झाला सध्या पोलिसांनी चालक शाहीर च्या विरोधात 304 अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिस तपास करत आहे
नवी मुंबई : डी वाय स्पोर्ट्स अकॅडमीकडून 16 व्या टी 20 कपचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 16 संघ यात भाग घेणार असून 240 खेळाडू यामध्ये खेळणार आहेत. भारतीय टिममध्ये खेळत असलेले नामवंत खेळाडूंचा धडाकेबाज खेळ जवळून पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. या टी 20 कपचे उद्घाटन मुबंई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात रोज चार सामने खेळवले जाणार आहे. पाच मार्चला उपांत्य फेरी असणार आहे.
यवतमाळ : निर्दयी मातेने नवजात अर्भकाला दगडाला बांधून तलावात फेकल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेनंदर सदर महिला फरार झाली आहे. उमरखेड तालुक्यातील निंगणूर येथील तलाव परिसरात ही घटना घडली.
अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीचं विमानातील विनयभंगाचं प्रकरण. दोषी विकास सचदेव यांची सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका, २ मार्चला सुनावणी. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाकडून ३ वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड. सचदेव सध्या जामीनावर बाहेर
मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर शहरात राजकीय भूकंप आला आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षाच्या सर्व जबाबदारीचा राजीनामा देत, राजकीय संन्यास घेतला आहे. त्यांनी प्रसारीत केलेल्या एका व्हिडीओ क्लिपद्वारे ही माहिती दिली आहे.
परभणीच्या पूर्णा तालुक्यात 68 कॉपी बहाद्दरांवर कारवाई, एबीपी माझाच्या बातमीनंतर शिक्षण विभागाच्या कारवाईला सुरुवात. 18 फेब्रुवारीपासून राज्यात 12 वीची परीक्षा सुरु झालीय. मात्र, या परीक्षेदरम्यान परभणी जिल्ह्यात थेट शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तर सांगत असल्याची बातमी दाखवल्यानंतर या शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असताना शिक्षण विभागाने असेच प्रकार सुरू असलेल्या महाविद्यालयांमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. आज विज्ञानाच्या पेपरला पूर्णा तालुक्यामध्ये दोन महाविद्यालयांमध्ये भरारी पथकाने तब्बल 68 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे उद्या राज्यभरात 400 ठिकाणी धरणे आंदोलन. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भाजपतर्फे अधिवेशन काळात करण्यात येणार आहे.
निवडून दिलेल्या सदस्यांनीच सरपंच निवडावा हे विकेंद्रीकरण नाही. असे झाले तर ग्रामपंचायतीत पक्षीय सत्ता येईल ती पद्धती लोकशाहीला मारक ठरेल. त्यासाठी सरपंच गावांनीच निवडावा. तेव्हा खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकेल आणि सकाळी आठ वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नाही किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काही राजकारण्यांना राहण्याची गरज पडणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं.
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महीला ठार, पेटगाव शेतशिवारातील घटना, रसिका मगरे नामक महिला शेतावर कामासाठी गेली असताना वाघाने हल्ला केला. संध्याकाळी ही घटना उजेडात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल.
गोंदीयात वादळी वाऱ्यासह पाउसाला सुरुवात, विद्युत पुरवठा खंडित
शिर्डी : साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांची परभणी येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नेमणूक झालेल्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांज आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. आपल्या पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेत त्यांनी पदभार स्वीकारला असून आगामी काळात शिर्डीच्या अनेक प्रलंबित कामाचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर शरद पवार यांना बोलावण्यात येणार असल्याचा दावा या प्रकरणातील पक्षकार सागर शिंदे यांचे वकील प्रदीप गावडे यांनी केलाय. माजी न्यायमूर्ती जयनारायन पटेल यांच्या नेतृत्वाखाली मागील सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर सागर शिंदे यांनी ही शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात यावं अशी मागणी केली होती. आज मुंबईत झालेल्या आयोगाच्या सुनावणीत ही मागणी मान्य झाल्याचं सागर शिंदे यांचे वकील प्रदीप गावडे यांनी म्हटलंय. सागर शिंदे हे विवेक विचार मंचाचे सदस्य आहेत आणि शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचे पुरावे द्यावेत अशी मागणी केलीय. शरद पवार आयोगासमोर आल्यावर आपण त्यांची उलट तपासणी करू असं वकील प्रदीप गावडे यांनी म्हटलय.
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणी आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनल ला आघाडी. अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे.
1. बाळासाहेब तावरे 1127 राष्ट्रवादी
2. रंजन तावरे 1102 सहकार बचाव
3. संजय काटे 1055 राष्ट्रवादी
4. पोपटराव बुरुंगले 1010
5. स्वरूप वाघमोडे 917
6. संजय काटे 246
औरंगाबाद : कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आज आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झालं असं वाटतंय. दुष्काळ, गारपीट या संकटामुळे कर्जाचा डोंगर मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर उभा राहिलाय. ते कसं कमी करायचं, याची चिंता असताना कर्जमाफीच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा धीर मिळालाय. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी होतील, अशी भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आज डोक्यावरच ओझं कमी झालय असं बोलताना त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
शेतकऱ्यांची कर्जमाफीची पाहिली यादी जाहीर असून यात 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत. 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे. आता कर्जमाफीसाठी 15 हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी पटलावर ठेवली आहे. त्यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.
पुण्यात कात्रज परिसरात आंबेगाव बुद्रुक भागात आठ पैलवानांनी एका सोसायटीत जाऊन मारहाण केली आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) रात्री पैलवानांनी तिघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला खोटा असल्याचा निर्वाळा सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीने दिला आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती. शिवाचार्य यांनी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. परंतु हा दाखला खोटा असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी दिली होती. खासदार डॉ. जयसिद्धशश्वर यांनी पुरावा म्हणून उमरग्यातील तालमोड गावातील सातबारा उतारा सादर केला होता. मात्र हा पुरावा खोटा असल्याचा अहवाल दक्षता समितीने दिला होता.
सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला खोटा असल्याचा निर्वाळा सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीने दिला आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती. शिवाचार्य यांनी बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. परंतु हा दाखला खोटा असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी दिली होती. खासदार डॉ. जयसिद्धशश्वर यांनी पुरावा म्हणून उमरग्यातील तालमोड गावातील सातबारा उतारा सादर केला होता. मात्र हा पुरावा खोटा असल्याचा अहवाल दक्षता समितीने दिला होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील सर्व आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सरकारमधल्या समन्वयासाठी सरकारमधील प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन
करणार आहेत. विधानभवनातील दहाव्या मजल्यावर होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनातील कामकाज आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अजेंडा यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
सीएए, एनआरसी कायदा महाराष्ट्रात लागू करु नये, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे. ते म्हणाले की, संपूर्ण देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात जनता रस्त्यावर येत आहे. या कायद्याला देशातील अनेक राज्यातून विरोध होत आहे. यामध्ये सर्व धर्मातील जनता भरडणार आहे. हा कायदा कोरोना व्हायरसपेक्षाही जास्त खतरनाक आहे. या कायद्याच्या विरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलनं/निर्दशनं होत आहे. हा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू करु नये अशी आमची मागणी आहे. या कायद्याचा मी निषेध करतो.
सीएए, एनआरसी कायदा महाराष्ट्रात लागू करु नये, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे. ते म्हणाले की, संपूर्ण देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात जनता रस्त्यावर येत आहे. या कायद्याला देशातील अनेक राज्यातून विरोध होत आहे. यामध्ये सर्व धर्मातील जनता भरडणार आहे. हा कायदा कोरोना व्हायरसपेक्षाही जास्त खतरनाक आहे. या कायद्याच्या विरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलनं/निर्दशनं होत आहे. हा कायदा केंद्र सरकारने रद्द करावा अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू करु नये अशी आमची मागणी आहे. या कायद्याचा मी निषेध करतो.
अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्ग्यात सध्या उरुस सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भगवी चादर चढवण्यासाठी पाठवली आहे. गेली सात वर्षे मातोश्रीवरुन अजमेर शरीफला चादर पाठवली जाते. यावर्षीही मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी युवासेना कार्यकारणी सदस्य राहुल कनाल यांच्या हस्ते भगवी चादर मातोश्रीवरुन अजमेर शरीफला पाठवली आहे. जी उद्या मंगळवारी ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्गावर चढवली जाणार आहे. त्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चादर ख्वाजा गरीब नवाझ यांच्या दर्ग्यावर चादर चढवली जाणार आहे.
शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरचे वाढते अत्याचार यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव, यावर चर्चा करण्याची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी, विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी सुरु
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आक्रमक, कामकाजाच्या सुरुवातीला विरोधकांकडून गदारोळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवात, विधानसभेचं कामकाज लाईव्ह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळात दाखल
कर्जमाफी, महिला अत्याचारावरून विरोधक आक्रमक, सरकारनं एकही आश्वासन पूर्ण न केल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका
आज डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी तणाव अजूनही कायम आहे. अगदी शेवटच्या क्षणी अमेरिकेनं व्यापारी करारातून माघार घेतली आहे. व्यापाराच्या मुद्द्यावरून ट्रम्प नाराज असल्याचंही कळत आहे.
लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या तयारीला लागली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मुंबईचा महापौर कायम राखण्याचं आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेने मुंबईत लोकहीतार्थ कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे, ज्या माध्यमातून शिवसेनेला घराघरात पोहोचता येईल. कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी संजय पोतनीस यांनी रविवारी (23 फेब्रुवारी) अशाच एका भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या रक्तदान शिबिरात जवळपास हजारो लोकांनी सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमाला शिवसेना खासदार अनिल देसाई, मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, आमदार विलास पोतनीस अशा सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती.
एल्गारचा तपास केंद्रानं काढून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच त्यावरुन मतभेद नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सीएए आणि एनपीआरबाबतची भूमिका ही काँग्रेससोबतच्या चर्चेनंतरच स्पष्ट केल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तीन महिन्यात म्हणजे, एप्रिलअखेर कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. दुसरीकडे गिरणी कामगारांसाठी 3 हजार 835 घरांसाठी 1 मार्च रोजी लॉटरी काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प 2 दिवसीय भारत दौऱ्यावर, अहमदाबादेत स्वागताची जय्यत तयारी, मोटेरा स्टेडियमही सजलं

2. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, सरकारची मोठी घोषणा, गिरणी कामगारांना घरांसाठी 1 मार्चला लॉटरी

3. आजपासून ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, वादग्रस्त मुद्दे टाळण्यासाठी महाविकासआघाडीची बैठक, तर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

4. ठाकरे सरकार 11 दिवसांत पडेल, भिवंडीतील कार्यक्रमात भाजप खासदार नारायण राणेंचे संकेत, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचाही दावा

5. अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला सेनेगलमधून भारतात प्रत्यार्पण, रॉ ची कारवाई, पुजारीवर खंडणी आणि हत्येचे तब्बल 200 गुन्हे

6. मुंबईत आता मेट्रो स्टेशनबाहेर भाडेतत्वावर सायकल मिळणार, 2 रूपयांत तासभर सायकलवारी, मुंबई वन मेट्रोचा उपक्रम


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.