LIVE UPDATES | अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
22 Nov 2019 07:58 PM
धुळे : सूर्य मावळतीला असताना पीक नुकसानीची केंद्रीय समिती कडून पाहणी, बॅटरीच्या प्रकाशात पाहणी करून पथक पुढे जळगावकडे रवाना
ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशची दाणादाण,
उपाहारापर्यंत बांगलादेश पहिल्या डावात 6 बाद 73 धावा, उमेश, ईशांत, शमी या त्रिकूटाचा भेदक मारा
ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात बांगलादेशची दाणादाण,
उपाहारापर्यंत बांगलादेश पहिल्या डावात 6 बाद 73 धावा, उमेश, ईशांत, शमी या त्रिकूटाचा भेदक मारा
यवतमाळ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, नेर तालुक्यात सोयाबिन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी, तूर या पिकांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत-बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटीला थोड्याच वेळात सुरुवात, पहिल्या डे-नाईट कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय
शिवसेनेची बैठक होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्याची निव़ड केली जाईल.. काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदासाठी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणांच्या नावांमध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे विधीमंडळ नेतेपद कुणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल. तरी, या बैठकीआधी दुपारी 12 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आघाडीतल्या मित्रपक्षांशी बैठक घेणार आहेत.

काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक, काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता आज निवडला जाणार
केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा आज पहाटे तीन वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली होती. याबाबतची माहिती केम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. नुकतेच या तीन महिन्याच्या मुलाला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार आहेत, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार आहेत.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी रात्री उशिरा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक. उद्धव, आदित्य, राऊतांची-पवार, सुप्रिया आणि अजितदादांसोबत खलबतं
2. दोन दिवसात महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता, आज दुपारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत निर्णायक बैठक
3. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह, सूत्रांची माहिती, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी थोरात आणि दोन्ही चव्हाणांमध्ये चुरस
4. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील महापालिकांमध्ये महापौरपदाची निवडणूक, महाविकासआघाडी इम्पॅक्टकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
5. एक डिसेंबरपासून मोबाईल इंटरनेट महागणार, जिओ, व्होडाफोन, आयडियासह प्रमुख कंपन्यांकडून मोबाईल डेटाच्या दरात वाढ, ग्राहकांना भुर्दंड
6. ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचं निधन, वयाच्या 85 व्या वर्षी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास, अग्रलेखांचा बादशहा काळच्या पडद्याआड