शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते दिल्लीहून मुंबईत पोहोचले, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
21 Nov 2019 11:07 PM
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुढील 48 तासांत सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता,
महाविकासआघाडीत आता अडचणीचे मुद्दे नाहीत; राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांची एबीपी माझाला माहिती
शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते दिल्लीहून मुंबईत पोहोचले, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या तीन वर्षातील परदेश दौऱ्यात 255 कोटींचा विमानखर्च, सरकारची संसदेत माहिती
जेएनयूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फीवाढ विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
उद्या 11 वाजता काँग्रेस- राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक, वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक, सर्व मित्रपक्षांशी चर्चा करणार, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांबरोबर बैठक होणार
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या चार वाजता बैठक , विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी बैठकीचे आयोजन, सर्व आमदारांना बैठकीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश, आजची बैठक संपल्यानंतर सर्व नेते रात्री मुंबईत पोहोचणार, उद्या सकाळी नऊ वाजता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईत बोलावली आहे, या बैठकीला केवळ राज्यातले नेते उपस्थित असतील.
काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपद बाळासाहेब थोरात यांनाच मिळणार विश्वसनीय सूत्रांची 'एबीपी माझा'ला एक्सक्लुझिव्ह माहिती. अशोक चव्हाण यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून महसूल मंत्रिपदासाठी थोरातांची पहिली पसंती आहे. जर काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष पद मिळालं तर त्यावर दोन्हीपैकी एका माजी मुख्यमंत्र्यांची वर्णी लागू शकते.
सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर एकवाक्यता, मित्रपक्षांशी चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा : पृथ्वीराज चव्हाण
सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर एकवाक्यता, मित्रपक्षांशी चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा : पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस अध्यक्षांना दबावात निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. एकीकडे सत्ता स्थापनेबाबत आघाडीच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे निरुपम यांनी ट्वीट करुन याबाबत भाष्य केलं आहे. ते लिहितात की, काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करुन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेस असा सपाटून मार खाल्ला की आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात आपण तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणं म्हणजे काँग्रेसला दफन करण्यासारखं आहे. त्यामुळे उत्तम ठरेल की, काँग्रेस अध्यक्षांनी दबावात निर्णय घेऊ नये, असं ट्वीट पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. आज सकाळी 7 वाजून 21 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली. डहाणू ,तलासरी परिसरात सोमवारपासून भूकंपाचे धक्के बसण्यास सुरु झाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत शेकडो धक्क्यांनी पालघर जिल्हा हादरला आहे. सोमवारी 2.6, 2.4, 2.2, 3.8, 3.3, 2.9, 1.9, 2.3, 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले होते. तर आज पहाटे बसलेल्या धक्क्याची शासकीय माहिती अद्याप मिळालेली नाही.

कोल्हापुरातील शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे. कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दानोळी इथे अथणी शुगर्सचा एक ट्रॅक्टर पेटवला तर सहा ट्रॅक्टरमधील हवा सोडून ऊसवाहतूक रोखली. तर हातकंणगलेमधील आळते इथे
व्यकंटेश्वरा कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरची हवा सोडून ऊसवाहतूक रोखण्यात आली.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. महाशिवआघाडीचं सरकार अखेर दृष्टीक्षेपात, आजच्या आघाडीच्या बैठकीनंतर शिवसेनेसोबत चर्चा, शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत फॉर्म्युलावर अंतिम फैसला
2. महाराष्ट्राचा राज्यकारभार उद्धव ठाकरेंनी हाती घ्यावा ही लोकांची भावना, संजय राऊत यांचं दिल्लीत वक्तव्य, राऊत सकाळी शरद पवारांना भेटण्याची शक्यता
3. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये पाऊण तास चर्चा तर पवारांच्या भेटीनंतर मोदी-शाहांमध्ये खलबतं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचा पवारांचा दावा
4. शेती नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात, 5 सदस्यीय पथक 3 दिवस विभागवार पाहणी करणार, पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्राला प्रस्ताव
5. बीपीसीएलसह पाच सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी सरकार विकणार, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय, सगळ्यात मोठ्या खाजगीकरणाला हिरवा कंदील
6. संपूर्ण देशात एनआरसी लागू होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची राज्यसभेत घोषणा, नागरिकत्व सिद्ध करणाऱ्यांनाच देशात जागा, शाहांचं वक्तव्य