LIVE UPDATES | राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल - पृथ्वीराज चव्हाण

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Nov 2019 11:11 PM
सहा तासांनंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली,
उद्या तीन वेगवेगळ्या बैठका होतील : पृथ्वीराज चव्हाण
सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचच सरकार येणार, आघाडीच्या बैठकीवर लक्ष ठेवून - संजय राऊत
राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरु आहे, येत्या 2-3 दिवसात निर्णय होईल - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लता मंगेशकर यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट
गेल्या दोन तासांपासून शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची खलबतं,
किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत झाल्याची सुत्रांची माहिती
सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार? दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू - सुत्र
सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार? दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू - सुत्र
100 व्या नाट्यसंमेलनाध्यक्ष पदी जब्बार पटेल यांच्या नावाची निश्चिती. कार्यकारिणीमध्ये झाले शिक्कामोर्तब.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढले
आसाममधील घुसखोरांची माहिती मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आसाममधील भाजप सरकारने राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) प्रकल्प हाती घेतला होता. परंतु हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचं काम आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना मार्फत केले जाणार आहे. सध्या मंत्रालयात सहाव्या मजल्यावर फक्त या कक्षाच्या निधीसाठी देण्यात येणारे मदतीचे चेक स्वीकारले जात आहेत. रुग्णांचे अर्ज मात्र सध्या वरळी येथील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, मंत्रालयातही अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
महाशिवआघाडीला काँग्रेस नेते सोनिया गांधींची मंजुरी, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापनेची शक्यता - सुत्र
राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात खलबतं,
मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण 10 जनपथवर पोहोचले,
थोड्याच वेळात सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : सीबीआयकडून आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेविरोधात पुणे सत्र न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल
बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघर जिल्ह्यातील जनतेचा विरोध, स्थानिक शेतकऱ्यांनी जनसुनावणी उधळून लावली. अखेर जनसुनावणी रद्द करण्याचा निर्णय
शिर्डी जवळील राहाता शहरात पोलिसांवर गोळीबार करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरांचा पाठलाग करताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. गोळीबारात पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले आहेत. एका आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. श्रीरामपुर येथील सोनसाखळी चोरीच्या टोळीतील सचिन ताठे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मोदी-पवार भेटीनंतर तातडीनं अमित शाह आणि मोदींची भेट
डिझेल पुरवठ्याअभावी रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प.. जिल्ह्यातील एसटीच्या 439 शहरी आणि ग्रामीण फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की.. रत्नागिरी शहर बसस्थानकातून गेल्या दोन दिवसात 346 फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर ग्रामीण भागात जाणाऱ्या 93 फेऱ्यांना डिझेल नसल्याचा फटका बसला. डिझेल नसल्याने रत्नागिरी डेपोत सर्व बसेस एका रांगेत लावून ठेवण्यात आल्या.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करून, सबळ पुरावे न देणाऱ्या एका याचिकाकर्त्याला नागपूर खंडपीठाकडून दोन लाख रुपयांचा दंड.. वर्धा जिल्ह्यातील सुरेश रंगारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडणूक अर्जात त्यांच्या विरोधात वर्धा जिल्हयात दाखल झालेल्या एका गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. मात्र, त्या याचिकेच्या सुनावणीवेळी सुरेश रंगारी त्यांच्या याचिकेच्या समर्थनार्थ सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी व्यक्तिगत लाभांसाठी याचिका केल्याचा ठपका ठेवत, न्यायालयाने सुरेश रंगारी यांना दोन लाखांचा दंड ठोठावला. सुरेश रंगारी यांनी हा दंड न भरल्यास त्यांच्या विरोधात जामीनपात्र वारंटही निघू शकतं.
पाऊण तासानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक संपली
मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी. शेतकऱ्यांनी साठवलेला जुना कांदा संपत आला आहे तर अवकाळी पावसाने नव्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय, यामुळे बाजारपेठेतील कांद्याची आवक मंदावली आहे. लासलगाव बाजार समितीत जुन्या कांद्याला काल सरासरी साडेपाच हजार रुपयांचा भाव मिळाला. आज सकाळच्या सत्रात जुन्या कांद्याची 624 क्विंटल तर नव्या कांद्याची 385 क्विंटल आवक झाली आहे. आज नव्या कांद्याला सरासरी 4700 रुपये तर जुन्या कांद्याला 5850 रुपये दर मिळाला. कांद्याच्या दरातील तेजीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही : शरद पवार
नाशिक : आरबीएल बँकेच्या ग्राहकांनी क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्यांना कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी बँकेच्या नावे फोन कॉल आले व्यक्तिगत माहिती गोळा करण्यात आली आणि काही तासातच त्यांच्या अकाउंटमधून पैसे गायब झाले. 10 दिवसात 32 ग्राहकांना अशाप्रकारे गंडा घालण्यात आला. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्य़ाची माहिती
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्य़ाची माहिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलं आहे. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.
फॉरच्युनच्या बिझनेसपर्सन ऑफ द ईयर 2019 च्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला अव्वल स्थानावर
फॉरच्युनच्या बिझनेसपर्सन ऑफ द ईयर 2019 च्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला अव्वल स्थानावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. दुपारी साडेबारानंतर संसदेत या दोन्ही नेत्यांची भेट होईल. भेटीचा विषय समजलेला नाही, परंतु या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अंकलखोप इथे उदगीर कारखान्याला ऊस वाहतूक करणारे 40 ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अंकलखोप इथे अडवले. यावेळी वाहन मालक आणि संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाचीही झाली. त्यानंतर जोपर्यंत ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहन मालक संघटनेने घेतला आणि नारळ फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा दावा, उद्धव ठाकरेंकडून सेना आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश

2. येत्या दोन ते तीन दिवसातं सत्तासंघर्षाचा तिढा सुटणार, राष्ट्रवादीतल्या विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, आज शरद पवारांविना काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

3. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, सावरकरांना भारतरत्नसाठी समर्थनच, राऊतांचा पुनरुच्चार

4. ई-चलानचा दंड न भरल्यास अटक होण्याची शक्यता, दंड भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ, मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची माहिती

5. बंद असलेली मुंबई-पुणे तिसरी रेल्वे मार्गिका 15 जानेवारीला सुरु होणार, नव्या वर्षात मुंबई-पुणे प्रवास सुरळीत, मध्य रेल्वेचा दावा

6. बैलाची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांवर भिगवन पोलिसांत गुन्हा, हत्येची घटना इंदापुरातल्या पोंदवडी गावची, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.