Yashwantrao chavan : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao chavan). यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. आज त्यांची जयंती आहे या निमित्ताने त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. 


एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे 40 वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल आणि जातिभेदरहित राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.


यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न आणि कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे अनेक विचार शेतकरी बांधवांसाठी त्यांनी मांडले.   


यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विनम्र अभिवादन केले आहे. 


 






 


यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे याबद्दल त्यांचे प्रामाणिक मत होते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha