सांगली :  वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे एका  ऊसतोड मजूराने कोयता चालवून एक विक्रमच केलाय. याा ऊसतोड कामगाराने एका दिवसात 20 गुंठ्यातील तब्बल 16 टन ऊस तोडून कोयत्याने ऊस तोडण्याच्या बाबतीत एक विक्रमच केलाय. असा सुपरफास्ट कोयता चालवणाऱ्या ऊसतोड मजुराचे नाव आहे ईश्वर रामचंद्र सांगोलकर आणि त्यांचे वय आहे 50 वर्ष. विशेष म्हणजे ज्या दिवशी ईश्वर यांनी हा ऊस तोडणीचा भीमपराक्रम केला त्या दिवशी त्यांनी दिवसभरात केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन 20 गुंठ्यातील 16 टन ऊस  आडवा केला होता, असे त्याच्या जवळचे लोक सांगत आहेत. ईश्वर यांच्या या भीमपराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा वारणा साखर कारखाना प्रशासनाने सत्कार करत सुपरफास्ट कोयता चालवणाऱ्या ईश्वरच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.


वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसपुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा करार केला. या ट्रॅक्टरवर जत तालुक्यातील खैराव  येथील ऊसतोड मजुरांची टोळी आली. याच टोळीत ईश्वर सांगोलकर यांचाही सहभाग आहे.  सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून विक्रम केला. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार केला. 


जत तालुक्यातील खैराव गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील असणारे ईश्वर सांगोलकर हा गेली पंचवीस वर्षांपासून वारणा साखर कारखाना आणि इतरही साखर कारखान्याला ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वाळवा तालुक्यासह अनेक तालुक्यात ऊसतोडीची कामे केली आहेत..मागील पंधरा दिवसापासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. 


सागर सावंत यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर यांनी एकट्याने दिवसाकाठी 16 टन ऊसतोड करून एक नवा विक्रम केला आहे. हा ऊस संजय फाटक यांच्या ट्रॅक्टर वाहनातून वारणा कारखान्याला पाठवण्यात आला त्याची पावती पाहून सर्वजण अवाक् झाले. कारण एका दिवसात त्यांनी 16 टन ऊस तोडला होता. या टोळीमध्ये 10 कोयते म्हणजे 10 पुरुष आणि  9 महिला असे काम करत आहेत. 


तसे पाहिले तर एक ऊसतोड मजूर हा एका दिवसाकाठी फक्त दोन टन ऊस तोडत असतो. मात्र एका दिवसात ईश्वर सांगोलकर यांनी एका दिवसात 16 टन ऊस तोडण्याची किमया केली आहे. ईश्वर सांगोलकर यांनी  अशोक सावंत यांच्या शेतात हा ऊस तोडणीचा विक्रम केला आहे.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





महत्त्वाच्या बातम्या:


विद्यापीठ शेतकऱ्यांना देणार दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण, कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र उभारणार


काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त