गोंदिया : कोरोना संसर्ग काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यातील तब्बल 600 च्या जवळपास विनाअनुदानित शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्य तसेच शिक्षकांवर आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे हे सर्व शिक्षक रोजगार हमी तसेच शेती कामावर जाऊन आपल्या उदरनिर्वाह चालवण्याकरिता पायपीट करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षकांची स्थिती पाहता राज्य शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी या सर्व शिक्षकांनी केलेली आहे.
उद्याचा देश घडवणारे हात सध्या शेतात राबताना दिसत आहे. ऐकुण जरा धक्का बसेल मात्र हे खरे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा तालुक्यातील हे घडत आहे. शेतात काम करणारे हे शिक्षक जिल्ह्यात विविध विनाअनुदानित शाळेत सेवा देत आहेत. शासनाने कायम स्वरुपी करण्याची मागणी हे शिक्षक अनेक दिवसांपासून करत आहेत. यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही तर दुसरीकडे हे शिक्षक शाळा संपल्यावर गावातील मुलांची शिकवणी वर्ग (ट्युशन) घेत दोन पैसे मिळवून आपला उदरनिवार्ह चालवत होते. मात्र, कोरोना काळात शिकवणी वर्ग देखील बंद पडल्याने जगायचे कसे? असा प्रशन या तरुण शिक्षकांना पडला. अशात गावात रोजगार हमीची कामे सुरू होताच या उच्चशिक्षित तरुण शिक्षकांनी हातात कुदळ, फावडा घेत काम करायला सुरुवात केली. आज गावातील रोजगार हमीची कामे संपल्याने मिळेल त्याच्या शेतात दीडशे ते दोनशे रुपये घेऊन काम करुन आपला उदरनिवार्ह चालवित आहेत.
Unlock 2 | असा असू शकतो ठाकरे सरकारचा अनलाॅक 2 प्लॅन
आता तरी सरकार लक्ष देणार का?
आज महाराष्ट्रात तब्बल 22 हजार शिक्षक विनाअनुदानित शिक्षण संस्थेत काम करत आहेत. तुटपुंजे मिळत असलेले मानधन पाहता या अगोदर सुद्धा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, एवढी स्थिती आजवर खालावली नव्हती. ज्ञानार्जनाचे काम करणाऱ्या शिक्षकावर अशी स्थिती आल्यामुळे आता मायबाप सरकार लक्ष देणार काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात आज 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Salon Reopens Tomorrow उद्यापासून राज्यात सलून सुरू होणार! साफसफाई करून ग्राहकांसाठी सलून स्टाफ तयार