मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात आज 5318 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे. यापैकी 84 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 67 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 4 हजार 430 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.94 टक्के एवढं आहे. राज्यात आज 167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 86 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, जळगाव 5, धुळे 4, अहमदनगर 2, नाशिक 2, वसई विरार 1, पिंपरी चिंचवड 1, जालना 1 आणि लातूर 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे.
राज्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 874 जणांची करोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 59 हजार 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 17.74 टक्के इतके आहे. राज्यात सध्या 67 हजार 600 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या 5 लाख 65 हजार 161 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत तर 36 हजार 925 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार