सोलापूर : कोविड संसर्ग काळात सर्वजण एकत्रित येऊन व्यवस्थित काम करत आहेत. मात्र, यावेळी काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला. राज्यशासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतचं ज्या पोलिसांनी उत्कृष्ट सेवा केली, त्यांना शौर्य पुरस्कार देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.


सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्याही जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख सोलापूर जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. आषाढी एकादशी जवळ आल्याने त्याचाही आढावा गृहमंत्र्यांनी यावेळी घेतला.


Unlock 2 | असा असू शकतो ठाकरे सरकारचा अनलाॅक 2 प्लॅन 


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाची मुद्दे

  • वारीची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत वारी कशी करता येईल यासाठी अनेक बैठका झाल्या आहेत.

  • मानाच्या पालख्या कशा आणाव्यात या बाबतीत चर्चा सुरू आहेत.

  • 30 तारखेला मानाच्या 9 पालख्याचे आगमन होईल, 1 तारखेला पादुकांचे स्नान होईल.

  • 2 जुलैला संध्याकाळी पालख्यांचे प्रस्थान होईल. जनतेने सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

  • हवामान वगैरे पाहून कसे आणायचे याचा निर्णय होईल, विमान, हेलिकॉप्टर की बस याबाबत निर्णय घेतला जाईल.

  • काही जिल्हाधिकाऱ्यांनी पासेस दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र, जिल्ह्यात येण्यासाठी कोणतेही पास ग्राह्य धरले जाणार नाही.

  • फक्त मानाच्या 20 पालखीना परवानगी असणार आहे.


Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार