शिर्डी: शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्हाला वेळेचं बंधन असणार आहे. कारण आजपासून शिर्डीमध्ये टाईम दर्शन सुविधा सुरू होणारे. ज्यामध्ये नोंदणी केल्यानंतरच आता भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे.
नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात १० काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.
दर्शनासाठीही आता फक्त १५ मिनिटांचाच अवधी असेल. तर या अंमलबजावणीसोबतच समाधीला लावण्यात आलेल्या काचाही काढण्यात येणार आहेत. ज्यामुळे भाविक आता समाधीला स्पर्श करून दर्शनाचा आनंद घेऊ शकतात.