रायगड : रायगडावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर नवी तलवार बसवण्यात आली आहे. खासदार संभाजीराजेंच्या हस्ते ही तलवार बसवण्यात आली. रायगडावरच्या मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग चोरीला गेला होता.

नव्याने बसवण्यात आलेली तलवार 50 इंच लांबीची असून तिचं वजन 20 ते 25 किलो इतकं आहे. या तलवारीवर नक्षीकामही करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील कलाकारांनी सलग 13 ते 14 तास काम करुन तयार केलेली ही तलवार पहाटे बसवण्यात आली.

मेघडंबरीत बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग चोरीला गेला होता. त्यानंतर याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी याठिकाणी दोन सीसीटीव्हीही बसवण्यात आलेत.

गडावरच्या मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पुतळा बसवण्यात आला आहे. 40 इंच लांब तलवारीपैकी 7 ते 8 इंचाचा भाग तुटल्याचं रविवारी आढळून आलं. तलवारीचा हा भाग नैसर्गिकरित्या तुटल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :


महाराजांच्या पुतळ्यावरील तलवारीचा काही भाग चोरीला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल