अहमदनगर : दसऱ्यानिमित्त होणाऱ्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 1 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तीन उपअधीक्षक, 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक, फौजदार, 325 पोलिस कर्मचारी, 75 महिला पोलिस, दोन आरसीपी प्लाटून, दोन राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून फौजफाटा मागवण्यात आला आहे.
पंकजा आणि शास्त्रींमधील वाद कायम पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बातचीत करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद कायम आहे.
विशेष पोलिस पथकाच्या जवानांनी महंताच्या दालनाला वेढा दिला आहे. तसंच पाण्याचा फवारा मारणाऱ्या गाड्याही भगवानगडावर तैनात केल्या आहेत. शस्त्रधारी शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, विशेष पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत.
मेळाव्याचं ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग याशिवाय पूर्वीच्याच जागी तीन हेलिकॉप्टर उतरण्याची सुविधा केली आहे. गडावरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ड्रोन कॅमेऱ्याने मेळाव्याचं शूटिंग करणार आहेत. पंकजा मुंडे गडावर असेपर्यंत भगवानबाबाच्या समाधीचं रांगेतून दर्शन देण्यासाठी विशेष दर्शन बारीची तयार करण्यात आली.
1000हून अधिक जणांना जमावबंदीची नोटीस याशिवाय भगवानगड परिसराच्या 14 गावातील 1000 हून अधिक जणांना कलम 149 अन्वये जमावबंदीची नोटीस बजावण्यात आली आहे
अनुचित घटना न घडण्याची शपथ दसऱ्याच्या निमित्ताने रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समता परिषद, रिपाइंचे हजारो कार्यकर्ते गडावर येणार आहेत. गडावर कोणतीही अनुचित घटना न घडू देण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस गोविंद केंद्रे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्याः