अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४८ वर्षीय पोपट साळवेला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी शनिवारी सायंकाळी भावंडासह घराच्या परिसरात खेळत होती. त्यावेळी नराधम आरोपीनं मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवलं आणि तिला शेतात नेलं.


आरोपी साळवेनं चिमुकलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या नातेवाईकाच्या गाडीचा आवाज आल्यानं आरोपी पळाला.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात आरोपीला अटक करण्यात आली असून १४ तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.