पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील मुंढेगावात काल रात्रीच्या सुमारात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पती-पत्नीसह दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला.


बशिर हुसैन शेख हे आपल्या कुटुंबीयांसोबत मुंढेवाडी गावात राहात होते. काल रात्रीच्या सुमारास घराचे छत (माळवद) पडून शेख यांच्यासह त्यांची पत्नी नफीसा शेख, एक 10 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून या घटनेतील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.