ठाणे : ठाणे पोलीस नियंत्रण कक्षामध्ये वारंवार फोन करुन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करणाऱ्या तिघांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. तीनही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ठाण्यात मजूर म्हणून काम करत होते.
मुकेश सक्सेना, गिरीश सक्सेना आणि आसू गौड अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही सध्या उल्हासनगर येथे राहत होते. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील फोन नंबरवर या तिघांनी कॉल केला. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन उचलून काय मदत हवी का? अशी विचारणा केली. मात्र फोन करणाऱ्यांनी अश्लील भाषेत बोलत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
महिला कर्मचाऱ्यांनी याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. मात्र फोन वारंवार आल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर तपास केला असता फोन डोंबिवली मानपाडा येथून येत असल्याचे ट्रेस झाले. हा प्रकार मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत सुरु होता.
आरोपींनी जवळपास 50 हून अधिक फोन कॉल्स केले अशी कबुली दिली. अखेर ठाणेनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि मध्यरात्री फोन करणाऱ्या तिघांना शोधून अटक करण्यात आली. मागील 27 जून पासून हे पोलीस कंट्रोल रुममध्ये फोन करुन पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी फोनवर शिवीगाळ आणि अश्लील भाषेत बोलणाऱ्या तिघांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2019 11:04 PM (IST)
तीनही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ठाण्यात मजूर म्हणून काम करत होते. आरोपींनी जवळपास 50 हून अधिक फोन कॉल्स केले अशी कबुली दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -