नांदेड : विवाहितेवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. चाकूचा धाक दाखवून नरधमांनी महिलेवर अत्याचार केले. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
पोळा सणासाठी ही महिला पतीसह तिच्या माहेरी निघाली होती. लातूरहून निघलेले हे दोघे नांदेडमधील मरखेलला रात्री उशिरा पोहोचले. मात्र गावात जाण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध नव्हतं. त्यावेळी या जोडप्याने गावातीलच रिक्षा ठरवली आणि निघाले. परंतु, रिक्षाचालकाने सोबतीला त्याच्या दोन मित्रांनाही घेतलं. यानंतर रस्त्यातच या तिघांनी महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला.
या तीन नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यावर हे दाम्पत्य अंधारात लपून बसले. उजाडल्यावर त्यांनी थेट मरखेल पोलिस स्टेशनक गाठलं. पोलिसांना सर्व प्रकाराची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना जेरबंद केलं.