सातारा : मुंबईच्या वाहतूक विभागातील पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या पार्थिवावर आज साताऱ्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विलास शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी शिरगावच्या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.
23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. आठ दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि काल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली.
विलास शिंदेंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी काल विविध राजकीय नेत्यांनाही हजेरी लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी वरळीत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन केलं.