मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच, राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या करण्यात आल्या असून ठाणे जिल्ह्याची कन्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांचीही बदली (Transfer) करण्यात आली आहे. कश्मीरा संखे यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्यातील आयटीडीपी या प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. संखे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. (आयएएस: आरआर: 2003) सचिव (वित्तीय सुधारणा, वित्त मंत्रालय) यांना मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. यांसह 2023 च्या बॅचचे आएएएस अधिकारी अरुण एम यांना गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्यातील 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. 18 नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्रिगुण कुलकर्ण हे सध्या पुण्यातील (Pune) सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच, राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार IAS (IAS) अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली होती. आता, आज 22 डिसेंबर रोजी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे, कुठल्या पदावर?
डॉ. कश्मीरा संखे (आयएएस: आरआर:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांना नाशिक जिल्ह्यातील आयटीडीपी, कळवानंद येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पदावर जबाबदारी देण्यात आली आहे. कळवान उपविभाग येथे त्यांची नियुक्ती असणार आहे. तर, अरुण एम. (आयएएस: आरआर: 2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, चार्मोशी उपविभाग गडचिरोली यांनाही गडचिरोली आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आयटीडीपी, प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोली उपविभाग येथे त्यांची नियुक्ती असणार आहे. यासह, वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. (आयएएस: आरआर: 2003) सचिव (वित्तीय सुधारणा, वित्त मंत्रालय) यांना मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध