मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध

गोंदिया इथं राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी हनुमान कथेचं आयोजन केलं आहे. त्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया इथं आले होते.

Continues below advertisement

Devendra Fadnavis hanuman chalisa gondia

Continues below advertisement
1/8
गोंदिया इथं राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी हनुमान कथेचं आयोजन केलं आहे. त्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया इथं आले होते.
2/8
देवेंद्र फडणवीस यांनी महाराजांचा आशीर्वाद घेत हनुमान कथा ऐकण्यासाठी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर सद्गुरू ऋतेश्वर महाराजांच्या कथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसून ऐकल्या
3/8
महाराजांच्या ओजस्वी वाणीतून निघालेली कथा ऐकताना मुख्यमंत्री फडणवीस तब्बल अर्धा तास मंत्रमुग्ध झाले होते, हनुमान भक्तीत ते लीन झाल्याचं पाहायला मिळालं.
4/8
कलियुगात इतके पाप आहे की, आपला आवाज ईश्वरांपर्यंत पोहचत नाही, हनुमंत कथेच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद मिळत राहो, अशी इच्छा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.
5/8
भगवान हनुमानजी आणि गुरुदेवजींचे आशीर्वाद आणि कृपा घेण्यासाठी मी आलोय. हनुमानजीच्या कथेच्या माध्यमातून गुरुदेवजींचे आम्हाला असेच आशीर्वाद मिळत राहील.
Continues below advertisement
6/8
हनुमानजींची बुद्धी.. हनुमानजीचं तेज हे सर्व आम्हाला मिळो... अशी प्रार्थना मी पूजनीय गुरुदेवजीच्या चरणी करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
7/8
प्रफुल पटेल यांनी मला बोलाविले त्यांचं धन्यवाद. गोंदिया इथं प्रफुल पटेल यांच्यावतीने श्री हनुमान कथेचं आयोजन केलं. यात फडणवीसांनी उपस्थिती लावून महाराजांचे आशीर्वाद घेतले.
8/8
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसा पठण केलं. मनोज्वं मारुत्तुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतम् वरिष्ठम्। वातामजं वनर्युत्मुख्यं श्री रामदूतम् शरणम् प्रपद्ये !! अंजनीच्या गर्भातून वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः !!! अशी हनुमान चालिसा फडणवीस यांनी म्हटलं.
Sponsored Links by Taboola