नांदेड : घरी बागायती जमीन पण मनात मात्र जिद्द अधिकारी होण्याची, एकामागून एक तीन्ही भावंडानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी बनले आहेत. अर्धापूर तालुक्यातील पांगरी या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या या तरुणांमध्ये जणू शैक्षणिक प्रगतीची स्पर्धा लागली आहे. या कुटुंबातील तरुण जिद्दने पोलीस उपनिरिक्षक, सेवा निरिक्षक व मंत्रालयात कक्षा अधिकारी झाले आहेत. गोरे कुटुंबातील तिन्ही भावंडानी यश मिळवून एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबात अधिकारी होण्याची चढाओढ लागलीय.


आपल्या कुटुंबात एक तरी शासकीय अधिकारी व्हावा या जिद्दीने येथील शेतकरी कुटूंबात चढावोढ लागली आहे. पांगरी या छोट्याशा गावात शासकीय अधिकारी, कर्मचारी झाले आहेत. येथील गोरे कुटूंबात तिन शासकीय अधिकारी झाल्याने शेतकरी पित्याच्या कष्टाचे चिज झाले आहे. गोरे कुटुंबातील तरुण जिद्दीने पोलीस उपनिरिक्षक, सेवा निरिक्षक व मंत्रालयात कक्षा अधिकारी झाले आहेत. विशेष म्हणजे एक जुलै या कृषी दिनी पोलीस उपनिरिक्षक निवडीची यादी लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाला दिली आहे.


पांगरी हे शे सव्वाशे उंबरठे असलेले छोटे खेडे गाव आहे. शेती हेच या गावचा प्रमुख व्यवसाय आहे. जमीन चांगली कसदार व पाण्याची सुविधा असल्यामुळे, शेतीतील उत्पन्न वाढीसाठी नव नवीन तंत्रज्ञाचचा उपयोग  केला जातो. शेतीची कास व शिक्षणाची आस धरलेला पांगरीकरांनी इतर खेडे गावातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. या गावात असेच एक शेतकरी कुटूंब आहे. या कुटुंबात भरपूर बागायती क्षेत्र आहे. कुटुंबाचे उत्पन्नही बऱ्यापैकी आहे. पण नरहरी गोरे यांनी मात्र मुलांना शेती सोबत शिक्षणाला ही तेवढेच महत्त्व दिल्याने गोरे कुटूंबात तिन शासकीय अधिकारी झाले आहेत. 


पांगरी येथील जनार्धन व नरहरी गोरे या बंधुंचे एकत्रित शेतकरी कुटूंब आहे. या कुटूंबाचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या कुटुंबातील संभाजी जनार्धन गोरे हे सेवा कर निरीक्षक झाला आहे. तर त्याचा छोटा भाऊ आनंदा जनार्धन गोरे हे गृह मंत्रालयात कक्ष अधिकारी झाले आहेत. पहिले दोन बंधू शासकीय अधिकारी झाल्याने तिसरा दत्ता नरहरी गोरे यांनीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. या तिन बंधूपैकी दोन अभियंते तर एक एमएसी अग्री असे शिक्षण आहे.


पोलीस प्रशासनात जाण्याचे स्वप्न दत्ता गोरे यांनी पाहिले. हे स्पप्न सत्यात उतरण्यासाठी पुणे गाठले. या शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्न्यात अपयश आले. या अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरु करून 2016 मध्ये परिक्षा दिली. यात त्यांना यश आले पण समांतर आरक्षणमुळे पुढची प्रक्रिया थांबली होती. 


उत्तीर्ण झालेले उमेदवारांनी मॅटमध्ये दाद मागितली. या मॅटने उमेदवारांच्या बाजुने निर्णय दिला. या मॅटच्या निर्णया विरूद्ध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानेही मॅटचा निर्णय कायम ठेवत उमेदवारांचच्या बाजूने दिल्यानंतर आयोगाने पात्र उमेदवारांची यादी शासनाला कृषीदिनी 1 जुलैला सादर केली. यात दत्ता गोरे यांच्या नावाचा समावेश आहे. 


ही गोड बातमी गोरे कुटूंबाला कळताच त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यंदाचा कृषी दिवस गोड झालाय. आमचे दोन बंधू शासकीय अधिकारी झाल्याने मला ही अधिकारी होण्याची आवड निर्माण झाली. यातून जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षेत उत्तीर्ण झालो. पण समांतर आरक्षणाच्या तिढ्याने पाच वर्षे वाट पाहावी लागली. पहिली दोन वर्षे  निकालाची वाट पाहण्यात गेले. तर तिन वर्षे न्यायालयीन लढाईत गेले. शेवटी न्याय मिळाला. कोरोनाच्या काळात शेतीच्या कामात गुंतलो होतो. कृषी दिनी ही बातमी मिळाली आमच्या कुटूंबाला खूप मोठा आनंद झाला आशा भावना दत्ता गोरे यांनी व्यक्त केल्या.