सांगली: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे विनापरवाना शस्त्रासह घुसलेल्या तीन आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्‍यामुळे या आरोपींना अटक करण्यात यश मिळालं आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अशा प्रकारे शिकारीसाठी हे तीन आरोपी येणार असल्याची माहिती खबऱ्यांकरवी वनविभागाला आधीच लागली होती.  


वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कायार्लयाला कळवून उपसंचालक उत्तम सावंत तसेच विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मागर्दशर्नाखाली पुढील तपास सुरू कला. विभागीय कायार्लयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे तसेच फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांना चांदोली येथे पाचारण करण्यात आले. त्याप्रमाणे चांदोली येथे तपास पथक तयार करण्यात 
आले आणि पुढील तपासाची दिशा ठरवण्यात आली. 


वन्यजीव विभागाचे तपास पथक पोहचताच तेथे संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्या ठिकाणी कसून चौकशी कली असता एक संशयीत आरोपी आढळून आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रा विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे मान्य कले. सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे त्याने सांगितलं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार इतर दोघांनाही वनविभागाने ताब्यात घेतलं. 


विनविभागाने आरोपींना वन्यजीव कायदा 1972 अन्वये अटक करण्यात आली. वन्य पशू-पक्षी पाळणे, हाताळणे, विक्री करणे, त्यांची शिकार करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम , 1972 अन्वये गुन्हा आहे. वन्य पशू-पक्षी यांना हाणी पोहोचवणार्‍यांबद्दल माहिती मिळताच तात्काळ 1926 (हेलो फॉरेस्ट) या टोल फ्री क्रमांकावर तसेच जवळच्या वनविभाग कायार्लयाशी संपर्क साधावा असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha