नागपूरः  छगन भुजबळांचे आर्थिक सल्लागार संजीव जैन यांचा तपास करू नका आणि त्यांना त्रास देऊ नका, असा धमकीवजा इशारा नागपुरातील डब्बा ट्रेडिंगमधील फरार आरोपी रवी अग्रवाल याने पोलिसांना दिला आहे.   संजीव जैन हे छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपी आहेत. पोलिसांनी जैन यांच्या कोलकात्यातील घरी जाउन त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर रवी अग्रवालने मुंबईतील एका एसीबीच्या अधिकाऱ्याला फोनवरून धमकी दिली आहे.   धमकीचा ऑडिओ 'माझा'च्या हाती फोनवरुन अग्रवालने दिलेल्या त्या धमकीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझाच्या हाती लागली आहे. धमकी देणारा रवी अग्रवाल हा नागपूरातील डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील मुख्य सुत्रधार असून तो सध्या फरार आहे.   पाहा संभाषणः