मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या आहेत. आता कॉलेज सुरु होण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
काल कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंय यांनी सांगितलं.
शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार आणि कॉलेजेस पुन्हा कधीपासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय येत्या 8 दिवसात घेणार असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलं होतं. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असंही त्यांनी म्हटलं होतं