पनवेल : नवीन अस्तित्त्वात येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता थंडावला आहे. 24 मे रोजी मतदान होणार असून 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.


महाआघाडी आणि भाजपमध्ये मुख्यत्वे ही लढत होण्याची शक्यता आहे. पनवेल निवडणुकीत शिवसेनेनेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची रॅली आणि उद्धव ठाकरे यांची सभा घेत शेवटच्या टप्प्यात प्रचारामध्ये बरोबरी साधली.

महाआघाडीमध्ये शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती झाली असून, भाजप स्वतंत्र लढत आहे.

महाआघाडीमध्ये शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12 जागांवर लढत आहे. शिवसेना 65 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 13 ठिकाणी आपले नशीब आजमावत आहे. तर भाजपने 78 उमेदवार उभे केले आहेत.

विशेष म्हणजे शहरी भागात पहिल्यांदा आमदार बच्चू कडू यांनी काही ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. नगरपालिकेची सत्ता ही भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हातात होती. त्यामुळे आता पनवेल महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

सात मुख्य लढती :

प्रभाग क्रमांक - 6 (ड)
प्रकाश गायकवाड (कॉलनी विकास आघाडी)
विरुद्ध
अशोक गिरमकर (शेकाप)

प्रभाग क्रमांक – 10 (क)
रामदास शेवाळे (भाजप)
विरुद्ध
रवींद्र भगत (शेकाप)

प्रभाग क्रमांक – 17 (ब)
शिवानी घरत (राष्ट्रवादी काँग्रेस)
विरुद्ध
सुशिला घरत (भाजप)

प्रभाग क्रमांक – 17 (ड)
संदीप पाटील (शेकाप)
विरुद्ध
अॅड. मनोज भुजबळ (भाजप)

प्रभाग क्रमांक – अ
प्रीतम म्हात्रे (शेकाप)
विरुद्ध
नितीन पाटील ( भाजप )

प्रभाग क्रमांक – 18 (ड)
प्रथमेश सोमण (शिवसेना)
विरुद्ध
विक्रांत पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक – 19 (अ)
परेश ठाकूर (भाजप)

विरुद्ध
बाळाराम पाटील (शेकाप)