पंढरपूर : खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी आता नवी सरकारी डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.
'15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही.' असा दावा चंद्रकात पाटील यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मुंबई, डोंबिवली, कल्याण, नाशिकसारख्या शहरात अनेकांचे खड्ड्यांमुळे बळी गेले आहेत. या शहरांसह राज्यातही बऱ्याच ठिकाणी अनेक रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. अशावेळी राज्यातील सर्व खड्डे बुजवण्यासाठी 15 डिसेबरपर्यंतचा वेळ पुरेसा ठरेल का? असा प्रश्न उपस्थित होत. आहे.


यंदा राज्यात प्रचंड पाऊस झाल्याने सर्वत्र खड्डे झाले त्यामुळे आता पुन्हा नव्याने खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यात आल्याचं पाटलांनी सांगितलं.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे बहुतांश रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्यांचा पायाच मजबूत नसल्याचा शोधही त्यांनी लावला. कोकणातील रस्ते तर गणपतीपूर्वी आपण स्वतः लक्ष घालून कोकणातील रस्ते दुरुस्त करुन घेतले. पण मुसळधार पावसामुळे पुन्हा खड्डे झाल्याचा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आता चंद्रकांत पाटील यांचा हा शब्द खरा ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित बातम्या :

‘तातडीने खड्डे बुजवा, अन्यथा हातात चाबूक घ्यावा लागेल’


महापौरांनी रात्री उशिरा कल्याण मधील खड्डे बुजवले!


10 फूट लांब, दीड फूट खोल... नवी मुंबईत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?


पुण्यातीलही रस्त्यांचे खड्डे 'गोल गोल'


मुंबई-गोवा हायवेवर खड्डेच खड्डे, लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात


मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी